सोलापूर : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने मोठे दु:ख झाले आहे. ते नेहमी संकट मोचक म्हणून आपली भूमिका पार पाडत असत. काँग्रेस पक्षात असो किंवा देशाचे राष्ट्रपती म्हणून काम करताना त्यांनी कणखरपणे आपली भूमिका मांडली, असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माझ्या बाबत ते नेहमी आस्था ठेवून होते. माझ्याशी त्यांचे नेहमी जिव्हाळ्याचे संबध होते. त्यांच्यामुळेच मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले. मी दिल्लीच्या राजकारणात गेल्यावर ऊर्जामंत्री म्हणून काम करीत असताना ते अर्थमंत्री होते. लोकभेत त्यांनी माझ्या कामाचे मोठे कौतुक केले होते. माझ्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ते सोलापूरला येवून कार्यक्रमात सहभागी झाले होते. छोट्या कार्यकर्त्यांचा सन्मान कसा करावा हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे होते. त्यांच्यासारखा कणखर आणि संयमी नेता पुन्हा होणार नाही. त्यांच्या निधनाने मला आयुष्यभर दु:ख राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना, असा शोक व्यक्त केला आहे.