मुंबई : कायमच आपल्या जळजळीत वक्यव्यांसाठी आणि भुवया उंचावणाऱ्या गौप्यस्फोटांसाठी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिच्या एका ट्विटमुळं आता तिच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे. पोलीस यंत्रणेवर अविश्वास दाखवणाऱ्या बी- टाऊनच्या या क्वीनला आता शिवसेनेच्या संजय राऊत यांनीही खडे बोल सुनावले आहेत. हा काय तमाशा चालला आहे, अशा शब्दांत त्यांनी तिच्यावर आगपाखड केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राम कदम यांच्या ट्विटला उत्तप देत कंगनानं आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते असं ट्विट करत म्हटलं होतं. ‘मुव्ही माफीया गुंडापेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते’, असा खळबळजनक आरोप तिनं केला होता. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या; पण मुंबई पोलिसांकडून नको, असं तिनं ट्विटरवर म्हटलं आणि नव्या वादानं डोकं वर काढलं.
कंगनाच्या याच ट्विटचा समाराच घेत राऊतांनी तिला आपल्याच शैलीत सुनावल्याचं पाहायला मिळालं. ‘मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय’, असं ते म्हणाले.
* कंगनाचे ट्वीट काय होते
बॉलिवूडमधील वाईट प्रवृत्तींविरोधात बोलत असल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मला संरक्षणाची गरज आहे. मात्र हे संरक्षण हिमाचल प्रदेश पोलिसांनी द्यावे अथवा केंद्रीय पोलिसांनी द्यावे, असे अभिनेत्री कंगना रनौत ट्विटरवर म्हणाली आहे. भाजप नेते राम कदम यांनी मुंबईत मुंबई पोलिसांनी कंगनाला संरक्षण द्यावे अशी मागणी करणारे ट्वीट केले होते. या ट्वीटला रिप्लाय करत कंगनाने पोलीस संरक्षण हवे असले तरी मुंबई पोलिसांची भीती वाटते असे सांगितले. याबाबत बोलताना ‘माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी,’ असे कंगनाने म्हंटले आहे.