मुंबई : अनेक दिग्गज मोठ्या अभिनेता अभिनेत्रींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोना शिरल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेता सुबोध भावेने यासंदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.
‘मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर उपचार सुरू आहे. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा’ गणपती बप्पा मोरया, असं ट्वीट अभिनेता सुबोध भावेनं केलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सुबोध भावे सोशल मीडियावर लहान मुलांसाठी कथा-गोष्टी ऑनलाइन स्वरुपात सांगत आहेत. ‘सुबोध दादाची गोष्ट’ लहान मुलांमध्ये खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सुबोध भावे आणि त्यांचं कुटुंबीय कोरोनातून लवकर बरं व्हावे यासाठी लहानांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत त्यांचे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.