जयपूर : राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात हादरून टाकणारी घटना घडली आहे. येथील खाप पंचायतीच्या आदेशानंतर नेछवा ग्रामपंचायतमधील सोला गावात एका तरूण-तरुणीला अपमानास्पद वागणूक दिली आहे. या तरूण-तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खाप पंचायतीने शुद्धीकरणाच्या नावाखाली ४०० लोकांसमोर अंघोळ घालण्याचा आदेश दिला.
शुद्धिकरण करण्याच्या नावाखाली पंचांनी हा आदेश दिला. तरुणीला निर्वस्त्र करून आंघोळ घालण्यात आली. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या मोबाइल कॅमेऱ्यात त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढले. मात्र, कुणीही या अमानवीय घटनेची माहिती पोलिसांना दिली नाही. ही डोक सुन्न करणारी घटना २१ ऑगस्टला घडली आहे. मात्र, या घटनेबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिळालेल्या माहितीनुसार, खाप पंचायतीने फर्मान सोडल्यानंतर माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. दुसरीकडे शिक्षा सुनावणाऱ्या खाप पंचायतीच्या पंचांनी दोघांच्याही कुटुंबीयांना दंड ठोठावला आहे. त्यानुसार तरुणाकडून ३१ हजार रुपये आणि तरुणीच्या कुटुंबीयांकडून २२ हजार रुपये वसूल करण्यात आले.
* …अखेर दहाजणांवर गुन्हा
अखिल राजस्थान सांसी समाज सुधार आणि विकास न्यासाचे प्रदेश अध्यक्ष सवाईसिंह मालावत यांनी सीकरच्या पोलीस अधीक्षकांकडे या घटनेची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.