सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात काल गुरुवारी 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर नव्याने 442 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात 783 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या आता 19 हजार 324 वर पोहोचली आहे. गुरुवारअखेर आणखी 305 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार 168 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 63 हजार 861 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 44 हजार 536 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी 305 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2 हजार 595 जणांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी 2 हजार 210 जण निगेटिव्ह, तर 384 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ग्रामीण भागातील 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 135 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
सोलापूर शहरातील 1041 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 983 निगेटिव्ह, तर 58 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तीनजणांचा मृत्यू झाला आहे. 147 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
* शहर – ग्रामीण कोरोनाबळी
गुरुवारी मृत्यू झालेल्यांमध्ये बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील 70 वर्षीय महिला, पंढरपूर शहरातील हनुमान मंदिरजवळील 69 वर्षीय पुरुष, मोहोळ तालुक्यातील गावडे वस्ती येथील 60 वर्षीय पुरुष, बार्शी शहरातील आदर्शनगर भागातील 76 वर्षीय महिला, माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील 70 वर्षीय महिला, मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ भागातील 72 वर्षीय महिला, माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील 60 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील 56 वर्षीय महिला, नातेपुते येथील 65 वर्षीय महिला, पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील 38 वर्षीय पुरुष, चारी येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शहरातील कर्णिकनगर भागातील 82 वर्षीय पुरुष, आदित्यनगर विजापूर रोड परिसरातील 52 वर्षीय पुरुष, शिवयोगीनगर, जुळे सोलापूर भागातील 69 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.