सोलापूर : विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी (ता. ७) सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची कोरोनाची चाचणी करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील आरटी- पीसीआर चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा उद्या रविवार सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
सर्व सदस्यांना शनिवारी आणि रविवारी त्यांच्या गावाजवळील शासनमान्य किंवा शासकीय प्रयोगशाळेत कोरोनाच्या चाचण्या करणे शक्य व्हावे,
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांचे रिपोर्ट त्यांना त्वरित उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयोगशाळा सुरू ठेवण्याचे आदेश विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिले आहेत.
ज्या प्रयोगशाळा सदस्यांची चाचणी केल्यानंतर रविवारी त्यांचा रिपोर्ट देवू शकत नाहीत, त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. चाचणीचा रिपोर्ट विधानमंडळ सचिवालयाला सादर करायचा आहे, असेही आदेशात म्हटले आहे.