नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणात अन्य राज्यातून कंगनाला पाठींबा मिळत असून मुख्यमंत्र्यांवर टीका होताना दिसत आहे. अशातच अयोध्येतील संतांनी अजब घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये, असं म्हटलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये अशी घोषणा केली आहे. जर ते आलेच तर त्यांचे स्वागत होणार नाहीच पण त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागेल, असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे.
हनुमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी कंगना रानौत हीचं घर वजा कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई आणि तोडफोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शिवसेनेवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आलीय. ‘यापुढे उद्धव ठाकरेंचं अयोध्येत स्वागत होणार नाही तर तीव्र विरोध केला जाईल’ अशी घोषणाच विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलीय.
वाराणसीमध्ये उद्धव ठाकरे, कंगणा राणावत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भित्तीपत्रक लावण्यात आली आहे. त्या भित्तीपत्रकामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण दाखवण्यात आलं आहे. त्यात उद्धव ठाकरे कंगणाचं वस्त्रहरण करत असून कंगणाचं संरक्षण करताना कृष्ण म्हणून नरेंद्र मोदींना दाखवण्यात आलं आहे.
अभिनेत्री कंगना रानौत राष्ट्रवादी शक्तींचं समर्थन करत आहे तसंच तीनं मुंबईतील ड्रग्ज माफियांविरोधात आवाज उचलला, म्हणूनच तिला जाणून-बुजून निशाण्यावर घेतलं जातंय, हे खूप स्पष्ट आहे’ असंही विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक प्रवक्ते शरद शर्मा यांनी म्हटलंय. तर अयोध्येतील संत समाजाचे प्रमुख महंत कन्हैया दास यांनी असामाजिक कारवायांत सहभागी असलेल्यांचा बचाव करण्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना अयोध्य न येण्याचा इशारा दिलाय. ‘बाळासाहेब ठाकरेंच्या आधीन असलेली शिवसेना आत्ता उरलेली नाही’, अशीही टिप्पणी त्यांनी केलीय.
दरम्यान, उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी अयोध्येत गेले नव्हते. त्यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की आम्ही जाणार आहोत. मात्र कंगणाच्या वादामुळे संतांनी ठाकरेंना न येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.