मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणावरुन आक्रमक झालेल्या विश्व हिंदू परिषदेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ नका असं बजावलं. यावरुन आता काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये असा इशाराच दिला आहे.
याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, विश्व हिंदू परिषद धर्माचे मालक नाहीत, त्यांनी जास्त वळवळ करु नये, विश्व हिंदू परिषदेत केवळ हिंदू नाव आल्याने धर्म त्यांचा झाला का? आम्ही हिंदू नाही का? यांचे बापाचे आम्ही बांधील नाही. विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय भानगडीत पडू नये असं त्यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही, कोणी कोणाला रोखू शकत नाही, हिंमत असेल तर रोखून दाखवावं. ज्या दिवशी वाटेल तेव्हा उद्धव ठाकरे जातील. हा प्रश्न धार्मिक भावनेचा आहे. अयोध्या आंदोलन विश्व हिंदू परिषद कुठे होती, असा सवालही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.