मुंबई : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विरोधकांनी मोदी सरकारच्या या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे. राज्यभरातून या शेतकरी निर्णयाविरोधात विरोधकांकडून टीका आणि आंदोलन झाली. याची दखल घेत अखेर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत केंद्राला पत्र लिहिले आहे.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा’, अशी मागणी फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसंच फडणवीस यांनी पियुष गोयल यांच्याशीही फोनवरुन या संदर्भात चर्चा केली होती. निर्यात बंदीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याची फडणवीसांनी पत्रात भावना व्यक्त केली होती.
भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यातबंदीवर नाराजी व्यक्त करत केंद्राला पत्र लिहिले आहे. उदयनराजेंच्या पाठोपाठ फडणवीसांनाही उशिरा का होईना शेतक-यांच्या प्रश्नावर जाग आली.
‘केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे.’ अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.
तसंच, ‘बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केली आहे.