सांगली : सांगली जिल्ह्यात आज 865 जणांना कोरोनाची बाधा झाली, तर दिवसभरात 613 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण बाधितांची संख्या 25 हजार 653 झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सांगलीत कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. कोरोनाबळीचा आकडा साडेनऊशे पार झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज 1319 आरटीपीसीआर टेस्ट झाल्या. त्यात 387 बाधित आढळले. 1997 अँटीजेन टेस्टमध्ये 500 बाधित आढळले. आटपाडी तालुक्यात 39, जत 30, कडेगाव 74, कवठेमहांकाळ 55, खानापूर 29, मिरज 143, पलूस 78, शिराळा 45, तासगाव 65, वाळवा 69 तर मनपा क्षेत्रात 238 बाधित आढळले. कडेगाव तालुक्यात 3, कवठेमहांकाळ 4, खानापूर 2, मिरज 2, पलूस 3, तासगाव 2, शिराळा 3, वाळवा 8 आणि मनपा क्षेत्रातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या 813 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आजचे बाधित 865, उपचाराखाली 9 हजार 247, बाधित 865, उपचाराखाली आजअखेर 15 हजार 437 रुग्ण बरे झाले आहेत. आजअखेर
969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांची भर पडत असल्याने रुग्णसंख्या 25 हजार 653 वर पोहचली आहे.