मोहोळ : प्रेमीयुगुलाने नैराशेपोटी नरखेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला मुलीने दोरी तर मुलाने तिच्या ओढणीच्या साह्याने दोघांनी एकाच वेळेस एकाच झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नरखेड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील प्रशांत रविंद्र शिंदे (वय १९ ) व प्रतिक्षा समीर शिंदे ( वय १४) या दोघांचे प्रेम प्रकरण होते. या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना मिळाली तर आपल्याला प्रखर विरोध होईल या भीतीने बुधवारी रात्री हे दोघेही घरातून निघून गेले.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
आज गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास नरखेड येथील बाळासाहेब शंकर पाटील यांच्या शेतातील बांधावरील एका लिंबाच्या झाडाला दोन वेगवेगळ्या फांदीला मुलाने ओढणीच्या सहाय्याने तर मुलीने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
यातील प्रशांत शिंदे याचे मुळगाव मोहोळ तालुक्यातील मोरवंची हे असून शिक्षणासाठी तो पुण्यात रहात होता. त्याचे आईवडील यापूर्वीच वारल्याने लॉकडाऊनच्या काळात नरखेड येथे आज्जीकडे रहात होता. याच लॉकडाऊन काळात दोघांचे प्रेम वाढले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे व पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अशुतोष चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचे प्रेत शवविच्छेदनासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मुलाच्या व मुलीच्या नातेवाईकांनी हांबरडा फोडला. प्रतिक्षा ही नरखेड येथे दहावीच्या वर्गात शिकत होती.
या घटनेची खबर पोलीस पाटील अरुण पाटील यांनी दिली असून याबाबत पोलिस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस उप निरीक्षक संतोष इंगळे करीत आहेत.