सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवा ‘तुघलक’ ही उपाधी प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो म्हणून रोजगार न देता उलट देशामध्ये बेरोजगारीचा उच्चांक वाढविला, असे म्हणत नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून रोजगाराचे लॉलिपॉप वाटून साजरा करण्यात आला.
या वेळी प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक विनोद भोसले म्हणाले, इतिहासात होऊन गेलेला तुघलक नावाचा राजा चित्रविचित्र निर्णयासाठी प्रसिद्ध होता. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी वागत आहेत. तुघलकाप्रमाणे चित्रविचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या, कोरोनाचे पन्नास लाख रुग्ण करणाऱ्या, सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने “तुघलक’ ही उपाधी प्रदान करत आहोत. त्याचप्रमाणे दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो म्हणून रोजगार न देता उलट देशामध्ये बेरोजगारीचा उच्चांक वाढविल्यामुळे नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे.
या वेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, दक्षिण सोलापूर विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, महापालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उपाध्यक्ष राजासाब शेख, सुभाष वाघमारे, किरण राठोड, राजेंद्र शिरकुल, शरद गुमटे, आकाश गायकवाड, संतोष अट्टेलूर, धम्मदीप जगजाप, अभिषेक गायकवाड, शिवराज कोरे, नरेश येलूर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.