पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज शुक्रवारी पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणी केली. अजित पवार पाहणी करण्यासाठी पहाटे सहा वाजताच पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी येथील कार्यालयात दाखल झाले. लॉकडाऊनमुळे पुणे महामेट्रोच्या कामात दिरंगाई आलीय का? कामगार पोहोचलाय का? यासह अन्य माहिती त्यांनी घेतली.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
अजित पवार येणार म्हटल्यावर भल्या पहाटेच व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितांसह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तयारी करुन ठेवली होती. अजित पवारांनी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. यावेळी पवारांनी स्टेशनवर तिकीट विक्री कशी असेल याचाही अनुभव घेतला. इतकंच नव्हे तर मेट्रोच्या रुळावर जाऊन काही अंतर प्रवासही केला.
पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणी करुन अजित पवार पुण्याकडे रवाना झाले असून तिथे ते कोरोना परिस्थितीबाबात आढावा बैठक घेतल्याचे वृत्त आहे.
* आपण पहाटे पहाटे शपथ घेत असतो
शरद पवार आणि अजित पवार वेळेचे अतिशय पक्के आहेत. ते वेळेचे कसे पक्के आहेत याचे किस्से सांगितले जातात. एवढंच नाही यंदा जानेवारीअखेरीस नाशिकमधल्या विकासकामांचं भूमिपूजनही त्यांनी भल्या पहाटे केल होतं. यावेळी अजित पवारांनी आपण पहाटे पहाटे शपथ घेत असतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या शपथेची आठवण करुन देताच हास्यकल्लोळ झाला होता.