अबुजा : वाढत्या बलात्काराच्या घटनांना रोखण्यासाठी आता बलात्कारातील दोषींना नपुंसक करण्याचा निर्णय नायजेरियातील कदुना प्रांतातील सरकारने घेतला आहे. इतकंच नव्हे तर १४ वर्षाखालील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यास दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अनेक देशांमध्ये महिलांविरोधात अत्याचार वाढत असताना या सरकारने घेतलेल्या निर्णयाची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* नायजेरियात बलात्कारीत घटनेने संताप
जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी देशांमध्ये बलात्काराच्या घटना वाढत आहे. नायजेरियातही या घटना वाढत असल्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. कदुना प्रातांत लोकांचा रोष इतका वाढला की राज्यपालांना आणीबाणीच जाहीर करावी लागली. राज्यपाल नसीर अहमद इल रुफई यांनी सांगितले की, गुन्हेगारांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
* महिलेचा गर्भाशय काढून टाकण्याची शिक्षा
देशात वाढत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार आहे. त्याशिवाय, एखाद्या महिलेनेदेखील १४ वर्षाखालील मुलावर बलात्कार केल्यास त्या महिलेचे गर्भाशय काढून टाकण्यात येणार आहे. तर, १४ वर्षावरील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. देशात वाढत असलेल्या बलात्कारांच्या घटना पाहता महिला संघटनांनी बलात्काऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. लोकांच्या संतापाची दखल घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयात अल्पवयीन मुलांवर महिलांकडून होणाऱ्या अत्याचाराचा समावेश करण्यात आला आहे.