मुंबई : भाजपा नेते आणि महाराष्ट्रातील माजी आमदार सरदार तारा सिंह यांचे निधन झाले आहे. मुंबईच्या लिलावती रुग्णालयात आज शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरसेवक ते आमदार असा सरदार तारा सिंह यांचा राजकीय प्रवास आहे.
भाजपा नेते किरीट सौमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. “माझे ज्येष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी लिलावती रुग्णालयात निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्मास शांती प्रदान करो,” असे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तारा सिंह यांची प्रकृती चिंताजनक होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाच्या अफवा देखील पसरल्या होत्या. मात्र त्यावेळेसही किरीट सोमय्या यांनी अफवेवर पडदा टाकत त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर मुलूंडचे भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी देखील लीलावती रुग्णालयात जावून तारा सिंह यांच्या कुटुंबाची देखील भेट घेतली होती. तसंच विनोद तावडे यांनी देखील तारा सिंह यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवून नका, असे आवाहन केले होते.
नगरसेवक ते आमदार असा सरदार तारा सिंह यांचा राजकीय प्रवास होता. सरदार तारा सिंह हे मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. 2018 साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेड च्या सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला होता.