मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत शनिवारी औरंगाबादेत आहेत. विद्यार्थ्यांनी मनात संभ्रम ठेवू नये. 1 लाख 92 हजार विद्यार्थी ऑनलाईन तर 11 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. पदवी प्रमाणपत्रावर कोविड-19 (Covid 19) असा कोणताही शेरा लागणार नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, 1 ऑक्टोबरला परीक्षा झाल्यास 10 तारखेला निकाल जाहीर केला जाईल. तात्काळ निकाल देण्यासाठी यंत्रणा उभारणीचं काम सुरू आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तशी चर्चाही झाल्याची माहिती त्यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांची मोठी समस्या झाली आहे. त्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे विद्यार्थी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. पदवीच्या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रमाणपत्रावर कोविड-19 (Covid-19) असा उल्लेख नसणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
पदवी प्रमाणपत्रात कोविड-19 चा उल्लेखाबाबत जो चुकीचा संदेश देईल त्यावर पोलीस कारवाई करणार असल्याचा इशारा उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे.
* ठळक मुद्दे
– 1 लाख 92 हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार
-11 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार
-निकालावर कोणताही शेरा लागणार नाही
-1 ऑक्टोबरला परीक्षा झाल्यास 10 तारखेला निकाल
-विद्यार्थ्यांनी मनात संभ्रम ठेवू नये
-तात्काळ निकाल देण्यासाठी यंत्रणा उभारणीचं काम सुरू