भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील बँक ऑफ इंडीया शाखेकडे निंबर्गी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांना पाण्यात उभारून पैसे काढावे लागत आहे.
कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने बँकेच्या खातेदारांना सोशल डिस्टन्स पाळत महिला व पुरुष खातेदारांना पाण्यात उभारुन पेैसे काढण्याची वेळ आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बँकेत पावसाचे पाणी जात असल्याने व बँकेच्या छताची सुध्दा मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. खातेदार व कर्जाचे सर्व फायली भिजत आहेत. त्वरित निंबर्गी ग्रामपंचायतीने दुरुस्ती न केल्यास सर्व फायली या पावसात भिजून जाण्याची दाट शक्यता आहे. सदर ग्रामपंचायतीने लक्ष घालून दुरुस्ती करून द्यावी, अशी ग्राहकांतून मागणी होत आहे.