पुणे : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. देशात सध्या जास्तीत जास्त टेस्टिंगवरही भर दिला जात आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं निर्मिती केलेली “कोविशिल्ड” लसचं काम तिसऱ्या टप्प्यात आहे.
कोरोनाला हरवणारी लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे, असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. तसेच दोन महिन्यांत कंपनी लसीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. कोविशिल्ड लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येत आहे. लसीच्या निर्मितीसाठी सीरम आणि ऑक्सपर्ड विद्यापीठात यापूर्वीच करार झाला आहे.
मिळालेली माहिती अशी की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसच्या 100 कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि गवी (Gavi) यांच्याशी करार केला आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला यांनी दिली आहे.
आदर्श पूनावाला यांनी सांगितलं की, या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. दोन महिन्यांत आम्ही या लसीची किंमत जाहीर करू. अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना व्हायरस लस तयार करीत आहे, ज्याचे टेस्ट रिझल्ट चांगले आले आहेत. आम्ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research – ICMR) यांच्यासमवेत भारतातील हजारो रुग्णांवर या लसीची चाचणी करणार आहोत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मला खात्री आहे की लशीची चाचणी यशस्वी होईल. यापूर्वी पूनावाला म्हणाले होते की, ऑगस्टच्या अखेरीस आम्ही मुंबई आणि पुण्यातील पाच हजार लोकांवर या लसीची चाचणी घेऊ. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसच्या 100 कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि गवी यांच्याशी करार केला आहे.
* सोमवारपासून पुण्यात डोस
‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्याला ससून हॉस्पिटलमधून सुरूवात होणार आहे. ससूनकडून स्वयंसेवकांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात ससूनसह 4 हॉस्पिटलमध्ये डोस दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यात देशभरात दीड हजार स्वयंसेवकांवर कोविशिल्ड लसीचा चाचणी होणार आहे.