सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता.२१) सकल मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एसटी बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास सद्यास्थितीत स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी मराठा समाज व मराठा आरक्षणाशी संबंधित असणा-या सर्व संघटनांच्यावतीने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या बंद काळात एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू शकतात. त्यामुळे एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार होवू नयेत, त्यामुळे कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी २१ रोजी मध्यरात्री १२ वाजून ०१ मिनिटांपासून २१ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला आहे.