मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज राज्यभर आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर मराठा समाजातर्फे आज सोलापुरात आंदोलन झाले. टप्प्या टप्याने राज्यभर आंदोलन उग्र होऊ लागले आहे.
मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक पार पडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाबाबत पुढील रणनितीबाबत चर्चा केली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. “मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली,” अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिली.
कोणत्या नेत्यांना आरक्षण नको आहे, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं. वेगवेगळी विधानं टाळून यात एक वाक्यता असायला हवी,” असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.