टेंभुर्णी : मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णया विरोधात सकल मराठा समाजाच्या पुकारण्यात आलेल्या आजच्या बंदला टेंभुर्णी शहरातील व्यापा-यांनी आपली दुकाने शंभर बंद ठेऊन आंदोलनास पाठींबा दिला. तसेच आंदोलनात महिलांनीही आक्रमकपणे सक्रिय सहभाग नोंदवला.
‘कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’ अशा घोषाणा देत महिलांनी सहभाग नोंदवला. करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ टेंभुर्णी मंडलाधिकारी मनीषा लकडे, टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने ‘जय जिजाऊ जय शिवराय,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं,कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही,एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत निवेदन दिले. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुरजा बोबडे यांनी निवेदन दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार मनोजकुमार गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, माजी उपसभापती तुकाराम ढवळे, भाजपाचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, राजकुमार धोत्रे, जिल्हाध्यक्ष वडार पँथर संघटना, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विलास कोठावळे तर जिजाऊ ब्रिगेडच्या टेंभुर्णी शहराध्यक्षा शीलाताई सटाले, रत्नमाला शिंदे पंढरपूर विभाग सचिव, सुनिता घाडगे, पल्लवी जाधव, सारिका शिखरे, स्वाती साखरे , ज्ञानेश्वरी जाधव , सारिका खडके, विद्या देशमुख या महिलांसह अनेकांची उपस्थिती होती.