मोहोळ : मराठा समाज आरक्षणाला लावलेली न्यायालयीन स्थगिती उठवण्यासाठी मोहोळ येथे मराठा समाजाने आज पुकारलेल्या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार यशवंत माने यांना घेराव घालून त्यांना निवेदन देण्यात आले.
सकल मराठा समाजाने आरक्षणाला दिलेल्या स्थगितीला विरोध करत सोलापूर ‘जिल्हा बंद’ची हाक दिली. मोहोळ तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज सोमवारी मोहोळचे आमदार यशवंत माने यांना मोहोळच्या रेस्ट हाऊसवर घेराव घालण्यात आला व त्यांच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी या ठिकाणी मराठा समाजाच्या विविध मान्यवरांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. ‘एक मराठा, लाख मराठा’ आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी यावेळी मनसेचे शाहु राजे देशमुख, शिवसेनेचे महेश देशमुख, महेश पवार, शुभांगी लंबे, नगरसेविका सिमा पाटील भाजपाचे सतिश काळे, अॅड. श्रीरंग लाळे , उमेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करीत आरक्षणाबाबत व्यथा मांडल्या. न्यायालयीन स्थगिती मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली.
यावेळी आमदार यशवंत माने म्हणाले की, आपण आक्षणासाठी लढत आहात मी आपल्या सोबतच आहे. उद्या सर्वात अगोदर आपल्या मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांचेकडे पोच करण्याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी सकल मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन उपस्थित महिलांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक संतोष गायकवाड, डॉ. प्रमोद पाटील, सत्यवान देशमुख, सतीश काळे, बाळासाहेब गायकवाड, ॲड. हिंदुराव देशमुख, महेश देशमुख, शाहूराजे देशमुख, मनोज मोरे, ॲड.श्रीरंग लाळे, सत्यवान देशमुख, हर्षल देशमुख, सचिन चव्हाण, सोमनाथ पवार, डॉ. स्मिता पाटील, साधना देशमुख, शुभांगी लंबे, मोहिनी हावळे, दिलीप गायकवाड, नाना डोके आदींची उपस्थिती होती.