सोलापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला. सकाळपासून मराठा समाजाचे शांततेत आंदोलन सुरु आहे. मात्र दुपारच्या सुमारास काही समाजकंटकाने बँकेच्या एटीएमवर दगडफेक करुन नुकसान केले आहे. त्यानंतर काही वेळाने सदर बझार हद्दीतील ममता रेडिमेडसह हार्डवेअर इतर दुकानावर दगडफेक केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला.
दहा-बारा लोक एकत्रित आले आणि काही सांगण्याच्या आत दुकानावर दगडफेक करुन नुकसान केल्याचे तेथील व्यापा-यांनी सांगितले. हे लोक सात रस्त्यावरुन हुमा मेडिकल मार्गे येऊन दगडफेक केल्याचे सांगण्यात आले. पोलीस बंदोबस्त असूनही अंधाधुंद दगडफेक करुन दुकानाचे काचा फोडल्या. व्यापा-यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे सांगितले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात जागोजागी आंदोलनाला सुरूवात झाली आहे. अशात सोलापूर बंदला गालबोट लागल्याची माहिती समोर येत आहे. सोलापुरातील एटीएम सेंटरवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीत ब्रह्मदेव माने सहकारी बँकेच्या एटीएमसह सदर बझार हद्दीतील ममता रेडीमेड कपड्याच्या दुकानासह इतर दुकानावर दगडफेक करत आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आंदोलन संपल्यानंतर कार्यकर्ते परतीच्या मार्गावर निघाले असता जगदंबा चौकातील ममता या कापड दुकानांवर दगडफेक केली, यामध्ये दुकानाचे काच फुटून किरकोळ नुकसान झाले. दगडफेक झाल्यानंतर चौकामध्ये पळापळ झाली तेव्हा तात्काळ पोलीस घटनास्थळी धावून आले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यांमध्ये झाली आहे.