कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात गोलमेज परिषदेला राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. या परिषदेत १५ ठराव या गोलमेज परिषदेत मांडण्यात आले. याचबरोबर १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा आज या परिषदेत देण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यभरातील मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होत. या परिषदेत मांडण्यात आलेल्या मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे, मेगा भरतीला स्थगिती द्यावी तसेच, मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचा ठराव यासह
१५ ठरावावर यावर चर्चा करण्यात आली.
* खासदार – आमदारांचे पुतळे जाळणार
सरकारने योग्य पावले उचलली नाहीत, तर याच परिषदेत ४८ खासदार आणि १८१ मराठा आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आला. या गोलमेज परिषदेत मराठा आरक्षणाची जबाबदारी थेट राज्य सरकारवर टाकण्यात आली. तर केंद्र सरकारला त्यातून क्लीन चिट देण्यात आली आहे. तसेच राज्यात करण्यात येणाऱ्या मेगा भरती स्थगित करण्यात याव्यात. तसेच सारथी संस्थेला एक हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी, असा ठरावही या गोलमेज परिषदेत करण्यात आला आहे.