सांगली : सांगली शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहातील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांनी आज रविवारी सकाळी पलायन केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
राजू कोळी व रोहित जगदाळे असे दोघा कैद्याची नावे आहेत. हे दोघेही कैदी सराईत गुन्हेगार आहेत. यात विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांनी पलायन केल्याने पोलीस यंत्रणा हादरली आहे.
दोघांनी वस्तीगृहातील सेंटरमधून आज पहाटे नाट्यमयरीत्या पलायन केले.दोघेही काळी वाट, हरिपूर, जिल्हा सांगली येथील रहिवाशी आहेत. सदरची घटना आज पहाटे घडली आहे. गेल्या आठवड्यात या दोघांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोन दिवसांच्या पोलिस कस्टडी रिमांड देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र त्याच पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेमुळे दोघा आरोपींना सांगलीतील एज्युकेशन सोसायटीच्या वस्तीगृहातील सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
आज पहाटे या दोघानी सर्वांची नजर चुकवून या केंद्रातून पलायन केल्याचे उघड झाले आहे. आज सकाळी कैद्यांची मोजणी करण्याचा प्रकार सुरू असताना सदरचा प्रकार उघड झाला आहे. या कैद्यांचा आता तपास सुरू करण्यात आला असून पोलिस यंत्रणा त्यांचा शोध घेण्यात गुंतली आहे.