सोलापूर : प्रभाग क्र. सहामधील नगरसेविका वत्सला बरगंडे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांची जागा रिक्त झाल्याने त्या जागेसाठी पोटनिवडणूक होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी, असे पत्र महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठविले आहे. मात्र, यावर आयोगाचे काहीच उत्तर मिळालेले नाही.
महापालिकेचे निवडून आलेले 102 नगरसेवक आहेत. त्यापैकी देशमुख-पाटील वस्ती व आमराई परिसरात राहणाऱ्या वत्सला बरगंडे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांची जागा रिक्त झाली आहे. आता त्याठिकाणी पोटनिवडणुकीचे वेध लागले आहे. महापालिकेच्या निवडणूक शाखेने 10 सप्टेंबर 2020 रोजी राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग सहाच्या पोटनिवडणुकीसाठी पत्र दिले आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाईल, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
* तौफिक शेख यांना 30 दिवसांची मुदत
दुसरीकडे एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे नगरसेवकपद सर्वसाधारण सभेला सलग सहा महिने गैरहजर राहिल्याने जिल्हा न्यायालयाने रद्द ठरविले आहे. त्याचवेळी त्यांना उच्च तथा सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर त्यांच्या जागेचा निर्णय होणार आहे.
“प्रभाग सहामधील एक नगरसेविकेचे निधन झाले आहेत. त्यामुळे या रिक्त जागेची पोटनिवडणूक घेण्यास परवानगी द्यावी, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. त्यांच्याकडून अद्याप उत्तर प्राप्त झाले नसून मान्यता मिळाल्यानंतर पोटनिवडणूक घेतली जाईल”
– पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त, सोलापूर