मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज बुधवारी सकाळी ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामींचा आरोप रायगडमधील न्यायालयाने फेटाळला आहे.
मात्र, या वेळी अर्णब गोस्वामींनी कारवाईवेळी आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एएनआय वृत्तसंस्थेने गुन्हा नोंद झालेल्याची माहिती दिली आहे. रायगड आणि मुंबई पोलिसांचे पथक जेव्हा अर्णबच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यावर कथित हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी रायगड आणि मुंबई पोलिसांनी आज रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला होता. यावर पोलिसांच्या कारवाईवेळचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये पोलीस मारहाण करताना दिसत नव्हते. मात्र, यावर गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनलने नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे.
यामध्ये अर्णब गोस्वामी हे उजव्या हातावर उमटलेला व्रण दाखवत आहेत. तसेच त्यांनी पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सचिन वझे व अन्य सात पोलिसांनी घेरून मानेला धरत घराबाहेर नेले. पायात शुजही घालू दिले नाहीत, असा आरोप केला आहे.