सोलापूर : मागील 6 दिवसांपासून पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले आमदार भारत भालके आज बुधवारी कोरोनावर मात करून आपल्य सरकोली गावी परतले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आमदार भारत भालके यांना 28 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसताच भालके यांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली आणि लगेचच उपचारासाठी पुणे गाठले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन कोरोना मुक्त व्हावेत, यासाठी विठ्ठल रुक्मिणी मातेस दुग्धाभिषेक केला, तसेच गावांगावांत असलेल्या मंदिरात अभिषेक, आरत्या देखील केल्या गेल्या.
6 दिवसांतच कोरोनावर मात करून भालके ठणठणीत झाले आहेत. आज ( बुधवारी ) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सायंकाळी उशिरा ते सरकोली येथील आपल्या घरी पोहोचले आहेत. भारत भालके सुखरूप घरी आल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. फेसबुक, व्हाट्सएप वरून आमदार भालके यांचे स्वागत करणाऱ्या पोस्ट्स मोठ्या संख्येने व्हायरल होत आहेत.