दुबई : आयपीएल २०२० च्या हंगामातील प्लेऑफला सुरुवात झाली असून क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना मुंबईने ५७ धावांनी जिंकला. आयपीएलमधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मुंबईच्या संघानं दिल्लीचा ५७ धावांनी पराभव केला.
या सामन्यात दिल्लीने मुंबईला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मुंबईच्या फलंदाजीला मात्र खास सुरुवात झाली नाही. तरीही मुंबई इंडियन्सने २० षटकांअंती शानदार ५ बाद २०० धावा केल्या होत्या.
अपेक्षेप्रमाणे मुंबईकडून या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डिकॉक सलामीला आले होते. परंतु रोहितला दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गोल्डन डकवर बाद केले. त्यानंतर ११.५ षटकांत मुंबईने ३ विकेट्स गमावून १०० धावा केल्या होत्या.
तत्पूर्वी मुंबईचा संघ धावा करताना चाचपडतानाही दिसत होता. असे असताना पुढे सुर्यकुमार यादव, इशान किशन व हार्दिक पंड्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने शानदार ५ बाद २०० धावा केल्या. यात सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूत ५१ धावा, इशान किशनने ३० चेंडूत ५५ धावा व हार्दिक पंड्याने १४ चेंडूत ३७ धावा केल्या. हार्दिकने १४ चेंडूतील ५ चेंडूवर तर षटकार मारला होते. इशान किशनने ४ चौकार व ३ षटकारांची बरसात केली. तर सुर्यकुमारने ६ चौकार व २ षटकार मारले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२०मध्ये ज्याप्रमाणे साखळी फेरीचे खेळला, त्याचप्रमाणे त्यांनी प्ले ऑफचीही सुरुवात केली. सलामीची जोडी लवकर फुटल्यावर तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूने चांगली कामगिरी केली. त्यानंतर पुढेही कृणाल पंड्या शुन्य धावेवर बाद झाल्यावर मधल्या फळीतील व खालच्या फळीतील फलंदाजांनी बाजू सांभाळून नेली.
संपूर्ण स्पर्धेत मुंबईकडून जेव्हा जेव्हा वेळ आली, तेव्हा सर्वच स्थानावरील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अगदी संघ दबावात असतानाही फलंदाजांनी धावफलक हलता ठेवत सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत केली.
* कॅप्टन असाव तर असा…
सर्वांची कामगिरी चोख झालेली असताना राहुल चहरला मात्र महागडा ठरला. त्याच्या दोन षटकांत दिल्लीच्या फलंदाजांनी ३५ धावा चोपल्या. पण, विजयानंतर रोहितनं फिरकीपटू राहुल चहरचे मनोबल वाढवले. त्यानं ड्रेसिंग रुमपर्यंत टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राहुलकडे सोपवली. रोहितच्या या कृतीनं सोशल मीडियावर कॅप्टन असाव तर असा… अशी कौतुकपर चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्स आता विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर असून जर त्या सामन्यात मुंबईकडून पुन्हा एकदा चांगला खेळ झाला तर संघाचे पाचवे विजेतेपद नक्कीच पक्के आहे.
* अकरा वर्षानंतर लाजिरवाणा विक्रम दिल्लीच्या माथ्यावर
तब्बल ११ वर्षांनी आयपीएलमध्ये एका संघाचे सुरुवातीचे ३ फलंदाज शुन्यावर बाद झाले आहेत. तब्बल अकरा वर्षानंतर लाजिरवाणा विक्रम दिल्लीच्या माथ्यावर पडला आहे.
काला गुरुवारी मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० च्या क्लालिफायर १ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ५७ धावांनी पराभूत केले. तसेच अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात मुंबईने दिल्लीला २०१ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने पहिल्या ३ विकेट्स शून्यावरच गमावल्या. त्यामुळे दिल्लीच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
२०१ धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून सलामीला उतरलेल्या पृथ्वी शॉला आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेला मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात बाद केले. शॉ आणि रहाणेला भोपळाही फोडता आला नाही.