पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा अर्थात पायी दिंडी आज काढण्यात येत आहे. नामदेव पायरीचे दर्शन घेवुन पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चास सुरुवात झाली आहे. पायी दिंडी ऐवजी आंदोलक वाहनातून रवाना झाले. दुपारी चार वाजता पुणे येथे बैठक होणार आहे.
कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहे. विविध ठिकाणीहून आलेल्या आंदोलकनाला आंदोलन स्थळी सोडण्यासाठी आंदोलकांची घोषणा बाजी करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय दिंडी काढली जात आहे. मात्र पोलिसांनी याठिकाणी मज्जाव केल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे.
अखेर नामदेव पायरी ते नवीन बस स्थानकापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बसस्थानकाजवळ पोलिसांना मोर्चा अडवला. यानंतर आंदोलक वाहनामधून पुण्याकडे रवाना झाले. दुपारी चार वाजता राज्यांचे मुख्य सचिवांसोबत आरक्षणाबाबत बैठक होणार असल्याने आंदोलक वाहनामधून रवाना झाले.
बदलापूर शहरातील मराठा नेते देखील आरक्षण आमच्या हक्काचे आहे,ते मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. दरम्यान पंढरपुरात दिंडीआधी पोलीस आणि आंदोलकांमध्ये गोंधळ सुरू झाल्यानं तिथे गोंधळाचं वातावरण आहे. आरक्षणासाठी पुन्हा एकदा सकल मराठा समाजाकडून एल्गार केला जात असून आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मराठा समाज बांधव सकाळपासूनच शिवाजी चौकात जमत आहेत. शहरात ठिकठिकाणी बॅरेकेटिंग लावून चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाजी चौकात जमलेल्या मराठा समाज बांधवांनी ‘जय जिजाऊ… जय शिवराय… एक मराठा … लाख मराठा’ अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलीस निरीक्षक, ३१ सपोनी/ उपनिरीक्षक ५०० पोलीस कर्मचारी, एक एसआरएफ तुकडी असा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूर शहरात आंदोलनासाठी गर्दी करु नका, अशी सूचना प्रशासनाने आंदोलकांना केली आहे. काल शुक्रवारी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आंदोलकांसोबत बैठक घेतली. माञ आंदोलक पायी आक्रोश मोर्चाचे मागणीवर ठाम आहेत. याचबरोबर या आंदोलनासाठी पंढरपूरमध्ये येणारे समाज बांधवांना पोलिसांकडून अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले उपस्थित होते.