पंढरपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विठ्ठलाची चैत्री, आषाढी याञा रद्द झाली आहे. माञ सध्या सर्व पूर्वपदावर येत असल्याने शासनाने कार्तिकी यात्रेला परवानगी द्यावी. वारकरी संप्रदाय सर्व नियम अटीचे पालन करेल अन्यथा वारकरी सांप्रदाय येथून पुढे सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालेल, असा इशारा वारकरी सांप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समितीने दिला आहे.
या समितीने आज रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी वारकरी संप्रदायाची भूमिका मांडली. पुढे बोलताना ते म्हणाले कि, शासनाने अद्यापपर्यंत कार्तिकी याञेबाबात भूमिका स्पष्ट केली नाही. वारकरी संप्रदायाने अकरा जणांची समन्वय समिती तयार केली आहे. या समितीने दहा प्रस्ताव तयार केले असून यापुढे शासनाच्या प्रतिनिधीसोबत ही समिती चर्चा करेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कार्तिकी यात्रेसाठी प्रत्येक मठात सप्तमी ते पौर्णिमा दरम्यान किमान ५० भाविकांना मुक्कामाची परवानगी द्यावी. कार्तिकी यात्रेसाठी बाहेर गावाहून येणारे दिंडीत दहा भाविकांना परवानगी द्यावी. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ६५ एकर व इतर ठिकाणी उघड्यावर निवासासाठी परवानगी देवू नये. एकादशीला २५ वारक-यांच्या दिंडीला नगरप्रदक्षिणासाठी सकाळी सहा ते बारा यावेळेत परवानगी द्यावी. चंद्रभागेत स्नान करणे, महाद्वार काला परवानगी द्यावी. कार्तिकी याञेला मंदिर उघडावे माञ यासाठी शासनाला काही अडचणी वाटत असतील तर निदान मंदिराचा दरवाजा तरी उघडावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी राणा महाराज वासकर, रामकृष्ण महाराज वीर, भागवत महाराज चवरे, निवृत्ती महाराज नामदास, विष्णु महाराज कबीर, नागेश महाराज बागडे, एकनाथ महाराज हंडे, चैतन्य महाराज देहुकर, गणेश महाराज कराडकर, देवीदास महाराज ढवळीकर, शाम महाराज उखळीकर आदी उपस्थित होते.