अहमदनगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधु प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख (वय ३२) यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गौरी ह्या यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांच्या गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहता) येथील आहे. पती यशवंत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौरी यांचा समाजकार्यात सहभाग होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नगर शहरातील उच्चभ्रू व राजकीय नेत्यांची वसाहत असलेल्या यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे. काल शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली.
गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गौरी प्रशांत गडाख मृतावस्थेत आढळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.