नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊन आता पाच तास झाले आहेत.बिहारमधील मतमोजणीत महाआघाडी पिछाडीवर पडताच काँग्रेसने ईव्हीएमवर शंका घेतली आहे. काँग्रेसचे नेते उदित राज यांनी महाआघाडी पिछाडीवर पडताच ईव्हीएमच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ईव्हीएम हॅक का होऊ शकत नाही, असा आरोप उदित राज यांनी केला आहे.
आतापर्यंतच्या टप्यामध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने १०० ते १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी पिछाडीवर पडत असल्याचा कल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट करत ईव्हीएमवर शंका घेतली ते म्हणाले. जर मंगळ ग्रह आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहाची दिशा पृथ्वीवरून नियंत्रित करता येत असेल तर ईव्हीएम हॅक का करता येणार नाही? अमेरिकेत जर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालं असतं तर ट्रम्प पराभूत झाले असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बिहारमधील मतमोजणीच्या सध्याच्या कलांमध्ये एनडीए १३० जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही १०० ते १०५ जागांवर आघाडीवर आहे. पक्षवार विचार केल्यास निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा ७२, जनता दल युनायटेड ४८, राष्ट्रीय जनता दल ६५, काँग्रेस २१ आणि लोकजनशक्ती पार्टी २ जागांवर आघाडीवर आहे. तर डावे पक्ष १९ जागांवर आघाडीवर आहे.
* वेळ का लागणार ?
बिहार निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरू असताना, दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेतली आणि कोरोना काळात करण्यात आलेल्या काही नवीन उपाय योजनांबद्दल माहिती दिली. आतापर्यंत सगळीकडे मतमोजणी आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आकडे अपडेट करण्याचं काम अगदीच सुरळीतपणे सुरू आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी मतं मोजली गेलेली आहेत, असं बिहार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मतमोजणीला उशीर होण्याचं कारण, मोजणी संथीगतीने सुरू आहे का, असं विचाल्यावर ते म्हणाले, “मतमोजणी संथगतीने सुरू आहे, असं नाही. मजमोजणीची गती तीच आहे, मात्र मतदान केंद्रांची संख्या वाढलीय, मतपेट्यांची संख्या वाढलीय, पोस्टल बॅलट्सची संख्या वाढलीय, त्यामुळे वेळ लागणार आहेत.
“मतमोजणी वेळेत व्हावी, यासाठी आम्ही जास्तीची मतमोजणी केंद्रंही उभारली आहेत. मात्र एका मतमोजणी केंद्रावर पूर्वी १५०० लोक असायचे, आता मात्र तीच संख्या १००० वर आली आहे,” असं हे अधिकारी म्हणाले.
बिहारमध्ये सुमारे ७.३ कोटी मतदार आहेत, आणि यंदा ५७ टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद झाली तेव्हा दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे एक कोटी मतं मोजण्यात आली होती. म्हणजेच ५.३० तासात फक्त एक कोटी मतमोजणी झाली आहे. त्यामुळे मतमोजणी पूर्ण व्हायला उशीर होणार, याचीच शक्यता जास्त आहे.