सोलापूर / पंढरपूर : बलिप्रतिपदा पाडव्या दिवशी म्हणजे उद्या सोमवारी शासन निर्णयानुसार राज्यातील मंदिरं उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. पण मंदिरं खुली करताना प्रत्येक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. याचं सरकारच्या गाडलाइन्स लक्षात घेत पंढरपूर मंदिरही आता भाविकांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये उत्साह पसरला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपुरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्यम मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामध्ये भाविकांना श्री विठ्ठलाचे फक्त मुख दर्शन मिळणार आहे. शासनाच्या गाइडलाइननुसारच दर्शन देणार असल्याची भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आज मंदिर समितीचि बैठक पार पडत आहे.
प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्वांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असे काही नियम यात नमूद करण्यात आले आहे.