लंडन : कोरोना व्हायरसची लाट यायचा धोका कायम असताना आता एक आनंदाची बातमी आली आहे. पुढच्या महिनाभरातच पहिली कोरोना लस लाँच होण्याची अपेक्षा आहे. ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे. ख्रिसमसच्या आधीच्या आठवड्यातच या लशीचे 100 लाख डोस उपलब्ध करून द्यायची तयारी ब्रिटनने केली आहे.
Pfizer COVID-19 vaccine महिन्याभरातच येईल, अशी आशा असल्याचं ब्रिटनचे मंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटलं आहे. गेल्याच आठवड्यात Pfizer ने त्यांची लस कोरोनाच्या विषाणूवर 90 टक्के परिणामकारक ठरते, असा निष्कर्ष काढला होता. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या देशाने Pfizer Inc आणि BioNTech यांच्याकडे 400 लाख लशींची ऑर्डर दिली आहे. एवढे डोस उपलब्ध झाले तर ब्रिटनची एक तृतीयांश लोकसंख्या कोरोना लस घेऊ शकेल. याशिवाय ब्रिटनने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेली लससुद्धा ऑर्डर केलेली आहे. आता सर्वच लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी निर्मितीचा वेग वाढवला आहे. क्लिनिकल ट्रायल्स शेवटच्या टप्प्यात असल्याने आणि प्रारंभीचे रिपोर्टस सकारात्मक असल्याने पुढच्या महिन्यात कोरोना लस उपलब्ध होऊ शकते.
* फक्त श्रीमंत- छोट्या देशांनाच परवडणार
Pfizer Inc ने तयार केलेली लस भारतात येणं तसं अवघड काम आहे. कारण ही लस साठवून ठेवण्यासाठी उणे 70 अंश तापमान लागतं. म्हणजे लस तयार झाल्यानंतर तो पोहोचवण्याचा खर्चच फार मोठा आहे. एवढी शीतयंत्रणा गावोगावी उपलब्ध करून देणं आणि लस आल्यानंतर 5 दिवसात तिचे डोस देणं हे फक्त श्रीमंत आणि छोट्या देशांनाच परवडू शकतं, असं म्हटलं जातं. या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील काम शांघाय फोसुन फार्मास्युटिकल ग्रुप कंपनीला पार पाडायचं आहे. ही कंपनी चीनमधील डीप फ्रीझ एअरपोर्ट वेअर हाऊस, रेफ्रिजरेटेड गाड्या आणि लसीकरण केंद्रांद्वारे एका क्लिष्ट आणि महागड्या प्रणालीच्या माध्यमातून या लसीचं वितरण करणार आहे.