नवी दिल्ली : जनधन खात्याचे अनेक फायदे आहेत. इतकंच नाही तर हे उघडणंही सोपं आहे. त्यामुळे आजच आपले खाते जनधनमध्ये ट्रान्सफर करा. ते कसे आणि फायदा काय याची सविस्तर माहिती वाचा.
लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने तीन हप्त्यांमध्ये ग्राहकांच्या जनधन खात्यात 1,500 रुपये टाकले होते. तुमचेही बचत खातं असल्यास ते जनधन खात्यात ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. याची प्रक्रियादेखील अतिशय सोपी आहे. पंतप्रधान जनधन योजने मध्ये खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नसते. पण जर तुम्हाला चेकबुकची सुविधा हवी असेल तर खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवणं आवश्यक आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* असे खाते करा ट्रान्सफर
जर एखाद्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर ते तुम्ही जनधन खात्यात ट्रान्सफर करू शकता. याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला बँक शाखेत जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचे बँक खाते जनधन योजनेत ट्रान्सफर होईल. अशात तुम्हाला जर जनधन योजनेंतर्गत बँक खातं उघडायचं असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत उघडू शकता. खातं उघडण्यासाठी कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून भरावा लागेल. संबंधित कागदपत्रं जोडल्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल.
* असा मिळेल लाखोंचा फायदा
जनधन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे डेबिट कार्डची सेवादेखील उपलब्ध आहे. या डेबिट कार्डवर 1 लाख रुपये अपघात विमा मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ग्राहकांनी 28.8.2018 नंतर खातं उघडलं आहे, त्यांचा अपघात विमा वाढवून 2 लाख करण्यात आला आहे. याशिवाय कार्डवर 30,000 रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण देण्यात आले आहे.
* जनधन खाते आधारशी लिंक करा
जनधन खाते आधारशी करा लिंक करा. सर्व खातेधारकांचा आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करून घेण्याच्या सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, ज्या खात्यांमध्ये पॅन नंबर आवश्यक आहे तिथे पॅन नंबर आणि जिथे आधार नंबर महत्त्वाचा आहे तिथे आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक असला पाहिजे. इतकंच नाही तर 2.30 लाख रुपयांचा फायदा हवा असेल तर प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये वेळीच आपलं खातं उघडा आणि आधारशी लिंक करा, असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं होतं.