मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या सोमवारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या खात्रीलायक सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी विधानपरिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित जागेसंदर्भात शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिल्याची माहिती समोर येत होती. त्यानंतर आता त्या थेट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकरांचा पक्षप्रवेश होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान शिवसेनेकडून किंवा उर्मिला मातोंडकरांकडून काही माहिती देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. 45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवल्याचं म्हटलं आहे.