औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.
महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं, अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं.
पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली.
पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत एकूण मतदान 2 लाख 41 हजार 908 इतके झाले. त्यापैकी तब्बल 23 हजार 92 इतकी मते अवैध ठरली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंतीक्रमांक नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंती क्रमांकाचा अंक नोंदवावा लागतो. तो पसंती क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये अस नियम आहे. पसंतीक्रमांक हे केवळ 1,2,3, अशा अंकामध्ये नोंदवाव. एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांत नोंदवू नये असा नियम आहे . तरीदेखील उच्चशिक्षित 23 हजार पदवीधर उमेदवारांना मतदान करता आले नाही हे विशेष ठरले आहे.