सातारा : राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिण मतदार संघाचे सलग 35 वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार विलासकाका पाटील – उंडाळकर (वय 84) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. साताऱ्यात हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल 7 वेळा कराडमधून आमदार मधून निवडून येण्याचा करिष्मा केला होता.
उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) त्यांच्या कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे कराडवर शोककळा पसरली आहे.
विलासराव पाटील हे काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले नेते होते. कराडचा बालेकिल्ला त्यांनी कायम राखला होता. आघाडी सरकारच्या काळात विलासराव पाटील यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून नेतृत्व केले. याच काळात त्यांनी सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री सुद्धा राहिले होते.
विलासराव पाटील यांनी राज्याच्या सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विलासकाकांनी 1962 मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी सलग 35 वर्षे प्रतिनिधित्व केलं. पुरोगामी विचारांचे व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले नेते अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. तब्बल 12 वर्षे मंत्री म्हणून त्यांनी वेगवेगळ्या खात्यांची धुरा सांभाळली होती. सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास अशा अनेक खात्यांचे काम त्यांनी पाहिले होते. अनेक सहकारी संस्थांची उभारणीही त्यांनी केली होती.
2014 च्या निवडणुकीत काँग्रेसनं कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं नाराज झालेल्या विलासकाकांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, पराभवानंतरही साताऱ्याच्या राजकारणातील त्यांचं महत्त्व कायम होतं. कालांतरानं त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन पक्षहितासाठी चव्हाण यांच्याशी जुळवून घेतलं होतं.
* राजकीय कारकीर्द
– जिल्हा परिषद सदस्य : 1967 ते 1972
– शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य
सातारा जिल्हा मध्यवती बँक (1967 ते आजअखेर संचालक)
अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा
– सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लड, जर्मन, फ्रान्स, थायलंड दौरा
– कराड दक्षिण मतदारसंघाचे 1980 ते 2014 पर्यंत सलग 35 वर्षे आमदार
दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री 1991 ते 1993
– विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री 1999 ते 2003
– सहकार व वस्त्रोद्योगमंत्री 2003 ते 2004
– महाराष्ट्र शासनाचा चीन अभ्यास दौरा 2008