Monday, August 8, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

ठाण्याची श्रुतीका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडियाची विजेती

Surajya Digital by Surajya Digital
January 6, 2021
in महाराष्ट्र
8
ठाण्याची श्रुतीका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडियाची विजेती
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ठाणे : ठाण्यातील डॉ. संदीप माने व राजश्री माने यांची कन्या श्रुतिका माने ( वय – २०) ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली. श्रुतिका हिचा जन्म इंग्लडला झाला. त्यानंतर ठाणे येथे आल्यावर सिंघानिया स्कूलमधून पुढील शालेय शिक्षण तिने घेतले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून एडव्हान्स हेल्थ एन्ड मेडिकल सायन्सची पदवीचे शिक्षण घेत आहे.

ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या ७ स्पर्धकांची ऑनलाईन ऑडिशन व मुलाखत घेण्यात आली. ऑस्ट्रेलिया येथे राहत असलेले राज सुरी यानी सौदर्य स्पर्धेसाठी स्पर्धकाना मार्गदर्शन केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

श्रुतीकाने कत्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. तिला अभिनयाची आवड आहे. २००१ साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी यानी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरूवात केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई येथे होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.

आपल्या यशाबद्दल बोलताना श्रुतिका म्हणाली की, मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी आहे ज्याची मला जाणीव आहे. भविष्यात आणखी काय असेल याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठिंबा मिळाला, त्यामुळे हे यश मी मिळवू शकले. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करण, त्यांच्यातील सामर्थ्य व कलागुण जगासमोर आणणे हा या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश होता, असे श्रुतिकाने सांगितले.

श्रुतिकाचे वडील डॉ.संदीप माने व आई डॉ राजश्री माने हे आयव्हीएफ स्पेशॅलिस्ट आहेत. मुलीच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुलीच्या यशाबद्दल आम्हाला आनंद झाला असून मुलीदेखील सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. मुलींच्या कतृत्वाला साथ दिली पाहिजे.

श्रुतिकाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. त्यानंतर तिने ठाण्यात आल्यावर सिंघनिया स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले होते. ती सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून एडव्हान्स हेल्थ मेडिकल सायन्स या पदवीचे शिक्षण घेत आहे. श्रुतिकाने कत्थक नृत्याचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच तिने अनेक वक्तृत्व स्पर्धेत संपादनदेखील केले आहे. श्रुतिकाला अभिनयाची आवड असून ती अभिनय देखील करत असते.

“मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली ही माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, माझ्यासाठी मिस इंडियाचा हा मुकुट खूप मोठी जबाबदारी आहे त्याची मला जाणीव देखील आहे”

– श्रुतिका माने

Tags: #ठाण्याची #श्रुतीकामाने #ठरली #ऑस्ट्रेलिया #मिस #इंडियाची #विजेती
Previous Post

आमदार मिटकरींचे भाजपला आव्हान, का झाले नाही ‘अहमदाबाद’चे नाव ‘कर्णावती’

Next Post

पंचगंगा प्रदूषित करणा-या कंपन्यांना ठोका टाळे, ठाकरे सरकारचा निर्णय

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंचगंगा प्रदूषित करणा-या कंपन्यांना ठोका टाळे, ठाकरे सरकारचा निर्णय

पंचगंगा प्रदूषित करणा-या कंपन्यांना ठोका टाळे, ठाकरे सरकारचा निर्णय

Comments 8

  1. superbeets says:
    2 years ago

    What a information of un-ambiguity and preserveness of valuable knowledge about unexpected feelings.|

  2. pew pew madafakas shirt unicorn says:
    1 year ago

    Way cool! Some extremely valid points! I appreciate you penning this write-up plus the rest of the site is also really good.|

  3. Shelba Pangilinan says:
    1 year ago

    Wow, wonderful blog layout! How long have you been blogging for? you made blogging look easy. The overall look of your site is excellent, let alone the content!|

  4. zortilonrel says:
    9 months ago

    Thanks for the update, can you make it so I receive an update sent in an email when you publish a fresh article?

  5. buyers guide to electric fans says:
    7 months ago

    You have remarked very interesting points! ps decent web site.

  6. ssd hosting uk says:
    6 months ago

    The other day, while I was at work, my sister stole my apple ipad and tested to see if it can survive a twenty five foot drop, just so she
    can be a youtube sensation. My iPad is now broken and she has
    83 views. I know this is totally off topic but I had to share
    it with someone!

  7. nova88 says:
    5 months ago

    555194 566977Thanks for helping out, superb info . 684634

  8. zomeno feridov says:
    5 months ago

    But wanna tell that this is very helpful, Thanks for taking your time to write this.

वार्ता संग्रह

January 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697