नवी दिल्ली : कोरोना काही केल्या संपण्याचे नाव घेईना, त्यात काही अफवामुळेही लोक वैतागले आहेत. यातच आता बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या आवाजात एक कॉलर ट्यून ऐकायला मिळते. त्या ट्युनलाही लोक वैतागलेत. परिणामी आता दिल्ली उच्च न्यायालयात बिग बींच्या आवाजातली कॉलर ट्यून बंद करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनपासून जेव्हा कोणी एखाद्या व्यक्तीला कॉल करतो त्याआधी कोरोनापासून कशी खबरदारी घ्यावी याबद्दल जनजागृती करणारा बिग बींचा कोरोना कॉलरट्यून सुरू करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोविड १९ जागरूकतेची कॉलर ट्यून काढून टाकण्याची मागणी करत दिल्लीच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एका हिंदी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार याचिकेत म्हटले आहे की, “अमिताभ बच्चन या कामासाठी भारत सरकारकडून पैसे घेत आहेत. तर देशात असे अनेक कोरोना वॉरियर्स आहेत, ज्यांनी कोरोना काळात सामान्य लोकांना अनेक प्रकारे मदत केली. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांच्या ऐवजी या कॉलर ट्यूनमध्ये त्याच लोकांना घ्यायला पाहिजे ज्यांनी समाजाची मदत केली.”
अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. लवकरच ते ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय अमिताभ ‘चेहरे’ आणि ‘झुंड’ या चित्रपटात दिसणार आहेत.