पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना २० जानेवारी पासून ऑनलाइन पासची गरज नसणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे घेण्यात आली. भाविकांना विठ्ठलाचे दर्शन उपलब्ध करून देताना करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा झाली.
यावेळी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. संक्रांतीनिमित्त स्थानिक महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. परंतु कोरोना असल्यामुळे मंदिरात रुक्मिणी मातेला वाणवसा करू दिला जाणार नसल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
१२ जानेवारीपासून रोज ८ हजार भाविकांना विठ्ठल रुक्मिणी दर्शन देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानंतर २० जानेवारीपासून मंदिरात सर्वांना प्रवेश मिळेल. मात्र कोरोनाबाबतची सर्व नियमावली पाळण्यात येणार आहे. यामुळे लहान मुले, ६५ वर्षापुढील लोक व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. त्याचबरोबर भाविकांना ओळख पत्राची आवश्क असणार आहे. तसेच पूर्वी प्रमाणे ऑनलाइन पास बुकिंग करून देखील भाविक त्यांच्या वेळेनुसार दर्शनासाठी येऊ शकतात, असे ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
यावेळी बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पडलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.