बार्शी : अयोध्या येथे श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरु आहे. त्या उभारणीत आपलाही सहभाग असावा म्हणून बार्शीतला चिमुकला वरद विपुल माढेकर (वय 8 ) याने स्वत:ला घरातील लोकांनी खाऊसाठी दिलेले पैसे डब्यात जमा करुन ठेवले होते. त्या पैशाचा डबा त्याने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अशोक संकलेचा, तालुका संकलन निधी प्रमुख आनंद सोमाणी, अनिल खजानदार यांच्याकडे सुपूर्द केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच प्रदीप सुदाम बुटे व सुदाम एकनाथ बुटे यांनी व वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपरतर्फे अतुल माढेकर व विलास नकाते यांचे तर्फे प्रत्येकी एक लाख रुपये निधी संघाच्या पदाधिकार्यांकडे सुपूर्द केला.
यावेळी रा. स्व. संघाचे तालुका कार्यवाह मोहन श्रीरामे, सहकार्यवाह तुषार महाजन, सुरेशभाऊ हालमे, राजाभाऊ शिंदे, महावीर कदम, सूर्यकांत देशमुख, जिल्हा शा. शि. प्रमुख व्यंकटेश केंची, जिल्हा धर्म जागरण सहप्रमुख महादेवराव कोळेकर, तात्यासाहेब घावटे, जितेंद्र मोरे आदी उपस्थित होते.