सोलापूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी विजापूर वेस ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत “गाडी ढकलो” आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला.
विजापूर वेस येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली संख्येने कार्यकर्ते जमले. तेथून सर्व कार्यकर्ते आपली दुचाकी वाहने ढकलत आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत बेगम पेठ पोलीस चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. तेथे आल्यानंतर मोदी सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महागाईचा उडाला भडका, केंद्र सरकारला द्या तडका, उठा उठा महागाई आली, मोदी सरकार जाण्याची वेळ आली, बेचारी जनता करे पुकार, लूट राही है मोदी सरकार, आम आदमी और किसान, झेल रहा पेट्रोल-डिझेल कि मार, वाह रे मोदी तेरा खेल , सस्ती दारू महेंगा पेट्रोल आदी गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
इंधन दरवाढीचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर “गाडी ढकलो”आंदोलन करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी रमीज कारभारी, विक्रांत खुणे,
प्रवीण साबळे, चेतन गायकवाड, सपन्न दिवाकर, सरफराज बागवान, झहीर गोलंदाज, विवेक फुटाणे, विशाल कल्याणी, आशिष बसवंती, मुबिन शेख, तुषार जक्का, प्रवीण फाळके, जावेद कोटकोंडी, कुणाल वाघमारे,आरिफ बागवान, रमीज मुल्ला, कामले, मोहसीन मुजावर, फरदिन शेख, अदनान शेख, शोएब बागवान उपस्थित होते.