बंगळुरु : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा अपघात झाला. हा अपघात कर्नाटकच्या अंकोला येथे झाला. यात श्रीपाद नाईक जखमी झाले. तर त्यांची पत्नी व सचिवाचा मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांना सध्या गोव्याच्या दवाखान्यात शिफ्ट केले जात आहे. पंतप्रधानांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन योग्य उपचाराची व्यवस्था करण्याची सूचना दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे प्रवास करीत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासोबत पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करता श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचे सांगितले जात आहे. ते यल्लपुराहून गोकर्ण येथे प्रवास करीत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्या पत्नीला या अपघातात गंभीर दुखापत झाली होती व रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांच्याशिवाय इतर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दुर्देवाने यामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर श्रीपाद नाईक यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
श्रीपाद नाईक हे गोव्यातील मोठं प्रस्थ आहे. गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या निकटवर्तींयापैकी एक आहेत. गोव्यातील भाजपचा चेहरा म्हणूनही त्यांचा ओळखलं जातं. श्रीपाद नाईक यांचे स्वीय सचिव दीपक यांचाही अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अंकोलाहून यल्लापूर मार्गे गोकर्णला जात होते. होनकुंबी गावाजवळ त्यांची गाडी पलटी झाली.