ओस्लो : नार्वेमध्ये नवीन वर्षात चार दिवसानंतर कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. कोरोना लसीकरणात फायजर-बायोएनटेकची लस वापरण्यात येत असून या लशीचे काही दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. लसीकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लस घेतलेल्या १३ जणांचा मृत्यू झाल्याचे नार्वेतील आरोग्य विभागाने म्हटले आहे.
रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने दिलेल्या वृत्तानुसार, नॉर्वेचे वैद्यकीय संचालक स्टेइनार मॅडसेन यांनी सांगितले की, या १३ जणांच्या मृत्यूंमध्ये ९ जणांना गंभीर साइड इफेक्टस आणि सात जणांना कमी गंभीर साइड इफेक्टस जाणवले. नार्वेत एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा संबंध लशीसोबत आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. आतापर्यंत १३ लोकांच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मॅडसेन यांनी सांगितले की, ज्यांच्या मृ्त्यूंची चौकशी करण्यात आली त्यामध्ये अशक्त, वृद्ध व्यक्तिंचा समावेश होता. यातील सगळ्यांचे वय ८० पेक्षा अधिक होते. या मंडळींना लस दिल्यानंतर ताप आणि इतर काही साइड इफेक्ट जाणवले असतील. त्यामुळेच त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मॅडसेन यांनी दिली.
अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण कमीच असल्याचे मॅडसेन यांनी म्हटले. हजोरोजणांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये हृदयाशी संबंधित आजार, डिमेन्सिया आणि इतर काही गंभीर आजार होते. लशीमुळे होणाऱ्या साइड इफेक्टमुळे आम्ही चिंतीत नसल्याचे त्यांनी सांगितले. नॉर्वेत आतापर्यंत ३३ हजारजणांना लस देण्यात आली आहे.