सोलापूर : बाबर हा मुस्लीम नव्हता व गोडसे, गाडगीळ, दाते त्यांचे वंशज होते, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात केले. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे ब्राम्हणसमाज नाराज झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समन्वय समितीचे समन्वयक मनोज कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.