नवी दिल्ली : पैसे देऊन टीआरपी वाढवल्याप्रकरणी क्राइम ब्रँचने नुकतेच 3600 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात 500 पाने ही बार्कचे सीईओ दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉटस्अॅप संभाषणाची असून त्या पुरवणी आरोपपत्रामुळे गोस्वामी अडचणीत येणार आहे.
टीआरपी प्रकरणात नुकतेच क्राइम ब्रँचने 3600 पानांचे अतिरिक्त पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यात 59 जणांच्या साक्षी, फॉरेन्सिक ऑडिटर पोलीस, संगणक तज्ञांचे पुराव्याबाबत अहवाल आहेत.
त्यात 500 पानांचे अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉटस्अॅप संभाषण आहे. रजत शर्मा आणि ट्राय यांच्यात झालेले संभाषण, दासगुप्ताने बार्कचे दिलेले गोपनीय पत्र, त्या पत्रानंतर पीएमओकडून काही मदत होईल का अशी विचारणा केल्याचे त्या दोघांमधील संभाषण आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच अर्णबची दिल्लीवारी, चॅनल्समधील ‘कट’ आणि सरकार काय मदत करेल का असे त्या दोघांमधील संभाषण झाले होते. त्याचप्रमाणे कंगनाची सर्वात प्रथम घेतलेली मुलाखत आणि त्याला आलेला प्रतिसाद, त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशला देव दूध पितात, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मागे ईडी, कर्नाटकातील फ्लोअर टेस्ट या बातम्या कशा पहिल्या दिल्या हे त्याबाबत अर्णबने दासगुप्तासोबत व्हॉटस्अॅपवर संभाषण केले होते.
* खडी फोडण्यासाठी इतके पुरावे पुरासे
ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील कथित व्हॉटस्अॅप चॅटचे स्नॅप शॉट टाकले आहेत. त्यांच्या मते हे चॅट गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यात झालेली बातचीत आहे.
भूषण म्हणतात, हे चॅटचे पसरलेले फोटो आहेत. या फोटोंवरून गोस्वामी यांच्या कटकारस्थानाचा पोलखोल होतो. शिवाय मीडिया आणि आपल्या पदाचा गैरवापर कसा केला गेला आहे हेसुद्धा उघड होते. कायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत.