कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रविवारी एक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांच्यासह जागतिक नेत्यांचे पोस्टर लोकांनी हाती घेतले होते. तसेच स्वतंत्र सिंधूदेशाची मागणी त्यांनी केली आहे. हा मोर्चा जी. एम. सय्यद यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त काढण्यात आला. सय्यद यांनी आधुनिक सिंधी राष्ट्रवादाची भावना लोकामध्ये निर्माण केली होती.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात झालेल्या आंदोलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील विविध देशांच्या प्रमुखांचे फोटो झळकावत आंदोलन केले. हे आंदोलन वेगळ्या सिंधुदेशासाठी मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात हे फोटो दिसून आले. भारतासह इतर देशांनी सिंधुदेशाच्या स्थापनेसाठी मदत करण्याची मागणी त्यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सानमध्ये वेगळ्या सिंधुदेशासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी जगभरातील नेत्यांनी स्वतंत्र सिंधुदेशच्या मागणीला पाठिंबा देत हस्तक्षेप करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सिंध प्रांतात इम्रान खान सरकारविरोधात रोष वाढत आहे. सिंध प्रांतातील जमीन चीनच्या ताब्यात दिली जात असून समुद्रही चीनच्या जहाजांना मासेमारीसाठी दिले जात आहे.
सिंधु प्रांत, सिंधु खोऱ्यातील व्यवस्था आणि वैदिक धर्माचे स्थान आहे. ब्रिटीश साम्राज्यने यावर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता आणि स्वतंत्र्याच्या वेळी पाकिस्तानच्या हाती हा प्रांत सोपवला असल्याचे आंदोलकांनी केला.