सातारा : राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. उदयनराजे यांना त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने विजय मिळवला आहे.
सातारा जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर ९८ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले हाेते. आज साेमवारी सकाळी आठला मतमाेजणीस प्रारंभ झाला.
सातारा तालुक्यातील अंगापूर वंदनमध्ये ११ जागांसाठी लढत झाली. येथे आमदार शशिकांत शिंदे , आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाच्या एवर्जीनाथ ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व ११ जागांवर विजय मिळविला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील एवर्जीनाथ ग्रामविकास महाआघाडी पॅनेलचा पराभव झालेला आहे.
साताऱ्यातील कोंडवे हे गाव उदयनराजे यांनी दत्तक घेतलं होतं. या गावात उदयनराजे गटाने जोरदार प्रचार देखील केला होता. तरीही त्यांना यश प्राप्त करता येऊ शकलेलं नाही. कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला १३ जागांपैकी केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने १० जागांवर मुसंडी मारली आहे.
अतीत ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या गटाने १० जागेवर विजय मिळविला आहे. सलग तीन वर्ष सत्ता अबाधित राखील आहे. अतित विकास पॅनेलने (समृद्धी जाधव, मनोज घोरपडे गट) तीन जागेवर विजय मिळविला आहे.